LIVE UPDATES

महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा संपन्न

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 15:05 PM
views 34  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३२ वी अधिमंडळ वार्षिक बैठक (वार्षिक सर्वसाधारण सभा) मंगळवार २५ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात सायं. ४.३० वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.प्रथम दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. किर्ती किशोर बोंद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. वृंदावनी वर्णेकर यांनी मागील आर्थिक बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम केले. तसेच सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल, तेरीज, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. तसेच सन २०२६-२७ सालाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली. संस्थेच्या वतीने दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी कु. नेहल देवेंद्र तुळसकर, कु. नक्षत्रा गोविंद वर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला.

 तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. किर्ती बोंद्रे यांच्या कन्या कु. एकता किशोर बोंद्रे हिने एम. सी. ए. पदविका मिळविल्याबद्दल तिला गौरविण्यात आले. याचबरोबर महिलांकरीता हळदीकुंकू समारंभ करण्यात आला. सौ. माधुरी गोविंद वाडकर यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे संस्थेचे, सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.