LIVE UPDATES

Ubhadanda Ganpati Temple Vengurla : दिवाळीत बसतो बाप्पा आणि होळीला निघतो विसर्जनाला !

आपल्‍याला हे माहित आहे का?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 08:33 PM
views 90  views

वेंगुर्ला : गणपती बाप्पाचं विसर्जन दीड, पाच, सात किंवा दहा दिवसांत होते, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण एखाद्या गणपतीचं विसर्जन तब्बल ३ ते ४ महिन्यांनी होते असे कधी ऐकलंय का? कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावात एक अतिशय प्रसिद्ध आणि तब्बल १५० वर्षे जुने गणपती मंदिर आहे.

या मंदिराची परंपरा अत्यंत आगळीवेगळी आणि थक्क करणारी आहे. येथे गणेशोत्सवात नव्हे, तर दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाप्पाची वाजत-गाजत स्थापना केली जाते आणि या बाप्पाचं विसर्जन गणेशोत्सवात होत नाही, तर थेट 'होळी'च्या दोन दिवस आधी होतं. ३ ते ४ महिने चालणाऱ्या या उत्सवात माघ संकष्टी चतुर्थीला भव्य जत्रोत्सव भरतो.

विसर्जनाच्या दिवशी बाप्पाचा महाप्रसाद म्हणून 'म्हामने' हा खास कार्यक्रम होतो, ज्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक आवर्जून उपस्थित राहतात. बाप्पाची मूर्ती खांद्यावर घेऊन, भजनाच्या गजरात वाघेश्वर मंदिरामार्गे ही मिरवणूक सागरेश्वर किनाऱ्यापर्यंत जाते आणि तिथे बाप्पाला निरोप दिला जातो.

विसर्जन झालं तरी बाप्पाचा सहवास मंदिरात कायम असतो, अशी येथील दृढ श्रद्धा आहे. विसर्जनानंतर रिकाम्या आसनावर बाप्पाचा फोटो ठेवून मंगळवार आणि संकष्टीला रोजच्यासारखीच पूजा केली जाते. अशी ही अद्भूत आणि अनोखी परंपरा तुम्हाला माहीत होती का? 

संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद


ताजी बातमी

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
सातार्डा चेकपोस्ट दारू तस्करी प्रकरणात आणखी तिघांना अटक
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळमध्ये शिवसेना शहरच्यावतीने जिल्हास्तरीय नरकासूर वध स्पर्धा २०२६चे आयोजन
November 05, 2026
नेरूरमध्ये ७ नोव्हेंबर रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन
November 05, 2026
नेरूर मतदारसंघातील पशुपालक शेतकऱ्यांना मोफत मका बियाण्यांचे वाटप
November 05, 2026
जयंत पाटलांची पोलखोल करणार
November 05, 2026