
बेळगाव : हृदयविकार उपचार क्षेत्रात अरिहंत हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. उत्तर कर्नाटकातील पहिली ट्रान्सकॅथेटर पल्मोनरी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीपीव्हीआर) प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
या आधुनिक उपचारपद्धतीत कोणतीही चिरफाड न करता पायातील रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या साहाय्याने हृदयाची झडप बदलण्यात आली. त्यामुळे अरिहंत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना पुन्हा मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाण्याऐवजी कमी चिरफाडीतून उपचार घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्रातील सांगली येथील २३ वर्षीय तरुणावर ही प्रक्रिया करण्यात आली. त्याच्यादा बालपणी दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी झाली होती. मात्र तिसऱ्यांदा अरिहंत हॉस्पिटलमध्ये छाती न उघडता झडप प्रत्यारोपण करण्यात आले. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक राहिला. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांत रुग्णाला घरी सोडण्यात आले.
हृदयातून फुफ्फुसांकडे रक्तप्रवाह नियंत्रित करणारी पल्मोनरी व्हॉल्व्ह अरुंद झाल्यास किंवा तिच्यातून रक्ताची गळती होत असल्यास हृदयावर ताण पडतो. त्यामुळे धाप लागणे, थकवा व शारीरिक क्षमता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. ट्रान्सकैथेटर पद्धतीत रक्तवाहिनीतून कॅथेटर नेऊन झडप बसविली, जाते. योग्य रुग्णांमध्ये या प्रक्रियेमुळे पुन्हा ओपन हार्ट सर्जरी टाळता येऊ शकते.
बालहृदयरोगतज्जा डॉ. गोविंद औरादकर यांनी प्रक्रियेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सीटी स्कॅनद्वारे हृदयाच्या रचनेचे परीक्षण, योग्य झडपेची निवड आणि प्रत्यारोपणाचे नियोजन करण्यात आले. चेन्नई येथील एमएमएम हॉस्पिटलचे डॉ. शिवकुमार कोथंडम यांनी प्रॉक्टर म्हणून मार्गदर्शन केले. तर थायलंडमधील व्हीनस पी-व्हॉल्व्हच्या वरिष्ठ तांत्रिक विशेषज्ञ नत्ताया खानारसा यांनी तांत्रिक सहकार्य केले.
वरिष्ठ भूलतज्ञ डॉ. अविनाश लोंढे, डॉ. पूजा भुवालका, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पूजा कुलकर्णी व कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले. ही कामगिरीबद्दल हॉस्पिटलचे सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी कौतुक केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








