LIVE UPDATES

Mega health camp Sawantwadi : सावंतवाडीत उद्या महाआरोग्य शिबीर

मंत्री नितेश राणेंसह महाराष्ट्र भाजप सहप्रभारी सदानंद तानावडेंची उपस्थिती : जिमखाना मैदानावर भव्य स्वरूपात आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 14, 2026 18:28 PM
views 33  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सेवा अभियाना अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभेत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलीत.

उद्या १५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर (डॉ. स्वार हॉस्पिटल समोर) भव्य दिव्य स्वरूपात महाआरोग्य शिबिर होणार आहे. याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र भाजप सहप्रभारी खास. सदानंदशेठ तानावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चालू असलेल्या सेवा अभियाना अंतर्गत  तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भाजपा युवानेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी विधानसभा मध्ये ठिकठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.

उद्या सावंतवाडीत शिबीर होणार असून हे शिबिर सावंतवाडी शहर व माडखोल, कोलगाव, माजगाव व इन्सुली जि. प. साठी होणार आहे. या शिबिरासाठी बेळगाव येथील सुप्रसिद्ध केएलई रुग्णालयाची ९२ जणांची टीम येणार आहे. याव्यतिरीक्त पुणे येथील नामवंत रुबी, दिनानाथ मंगेशकर, ज्युपिटर, लोकमान्य कोल्हापूर येथील अथायू रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्फत तपासणी व मार्गदर्शन होणार आहे. ही तपासणी फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसून वर्षभर त्याचा फॉलोअप घेतला जाणार आहे.

यात डोळे तपासणी बरोबर मोफत चष्म्यांचे वाटप होणार आहे. त्या नंबरचे चष्मे त्यावेळी उपलब्ध नसले तरी पुढील आठ दिवसात ते चष्मे भाजपा जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याशिवाय इएनटी स्पेशालिस्ट मार्फत तपासणी करून गरजवंतांना श्रवणयंत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दिव्यांगांना काठी, वॉकर देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या शिबिरात टुडी-इको, इसीजी इ. सोई देखील उपलब्ध आहेत.

दोन दिवसापूर्वी मळेवाड येथे झालेल्या शिबिरात किडणी ट्रान्सप्लांटचे दोन रुग्ण आले होते. त्यांचा संपूर्ण खर्च शासकीय  योजनेतून व विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तगट तपासणी, रक्त तपासणी सारख्या सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येकांनी आधारकार्ड आणणे आवश्यक असून आयुष्यमान भारत सारख्या योजनेत नोंदणी सुलभ होईल. त्यामुळे परिसरातील नागरीक, जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, स्त्रीया यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आयोजक सिंधुदुर्ग भाजपा व सह्याद्री फाउंडेशन यांनी केले आहे.