
कुडाळ : नवरात्रौत्सव कालावधी हा एक उत्सवाचे, नारिशक्तीच्या सन्मानाचे प्रतीक आहे.आदिशक्तीचा जागर आणि महिला व मुलांच्या कलागुणांना वाव देणारा ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीचा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन समाजसेविका सौ. कीर्ती तटकरे यांनी नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवसाच्या रात्री केले यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथे युवा उद्योजक संतोष वालावलकर कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी आणि सिद्धिविनायक कॉलनी यांच्यावतीने नवरात्र उत्सव कालावधीत कला क्रीडा सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गेले पाच दिवस विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान विविध स्पर्धा आदी भरगच्च कार्यक्रमाने तसेच धार्मिक कार्यक्रमाने हा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे पाचव्या दिवशी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी श्रीमती मनिषा वालावलकर जेष्ठ नागरिक श्री तेंडुलकर पत्रकार अजय सावंत कथक विशारद नृत्यांगना व युवा उद्योजिका मृणाल सावंत ज्येष्ठ उद्योजक महारुद्र गाताडे पोलीस पाटील सौ स्नेहा सावंत सौ गाताडे ओंकार तेंडुलकर संतोष वालावलकर महेश प्रभू आनंद जामसंडेकर योगिता वालावलकर सीमा शिंदे भास्कर वैद्य तेजल वालावलकर शांभवी परब दुर्वा बांदेकर पल्लवी डीगसकर , श्री तटकरे सुप्रिया धामापूरकर सौ अर्चना करंगुटकर सौ पूजा नाईक सौ प्रीती पाटकर नीलम सातोसकर श्रावणी करंगुटकर सिद्धिविनायक कॉलनीतील महिला वर्ग पुरुष ,युवावर्ग आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना सौ तटकरे म्हणाल्या नवरात्रौत्सव कालावधी हा एक उत्सवाचे नारिशक्तीच्या सन्मानाचे प्रतीक आहे या कालावधीत दुर्गामातेचा अवतार असलेल्या आदिशक्तीचा जागर आपण नऊ दिवस उत्साहाने जल्लोषाने साजरा करत असतो यामध्ये नारीशक्तीचा सन्मान, महिलांच्या तसेच लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगितले मृणाल सावंत यांनी वालावलकर कुटुंबीय डीम स्क्वेअर व सिद्धिविनायक कॉलनी हे गेली चार वर्षे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करून येथील मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे दररोज विविध कार्यक्रमाबरोबरच विविध क्षेत्रात सर्व सामान्यांपासून ते उच्चपर्यंत सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी करून एक प्रेरणादायी काम केले जात आहे असे सांगितले श्री गाताडे यांनी सुद्धा नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या आज चौथ्या वर्षाच्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात यामध्ये पत्रकार अजय सावंत नृत्यांगना व युवा उद्योजिका मृणाल सावंत शून्यातून विश्व निर्माण करणारे महारुद्र गाताडे गणित गणित तज्ञ शिक्षक ओंकार तेंडुलकर गायक युसुफ आवटी गायिका सपना यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गेले चार दिवस विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले डान्स स्पर्धेमध्ये प्रथम रूही वालावलकर द्वितीय आर्या गवस यशस्वी भुरटे तृतीय अन्वी खंडागळे आत्मिक देसाई यांनी मिळवला या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वालावलकर यांनी केले.
ताजी बातमी
View all

पोलीस स्मिता माने मृत्यूप्रकरणी नवीन माहिती उघड
October 21, 2026

मिठबावमध्ये शिवलग्न सोहळा अन् सोने लुटण्याचा दिव्य उत्सव
October 21, 2026

कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
October 21, 2026

उच्च शिक्षण घेऊनही झारापची हर्षदा शेतीत अव्वल
October 21, 2026








