
नवी दिल्ली : येत्या ऑगस्ट महिन्यात अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोज टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार आहेत. त्यामुळे रिअॅलिटी शोच्या चाहत्यांसाठी ऑगस्ट महिना अतिशय खास असणार आहे.
खतरों के खिलाडी सीझन १५ (Khatron Ke Khiladi 15)
खतरों के खिलाडीचा १५ वा सिझन १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा सिझन चाहत्यांना कलर्स टीव्ही आणि जिओ-हॉटस्टार (Jio-Hotstar) यावर पाहता येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करणार असून यामध्ये गौरव खन्ना, रुबिना दिलैक, करण वाही, ऋत्विक धनजानी, अविनाश मिश्रा, जस्मिन भसीन, हर्ष गुजराल, विशाल आदित्य सिंग, अविका गोर, शगुन शर्मा, फरहाना भट्ट आणि ओरी हे स्पर्धक असणार आहेत.
भोजपुरी बवाल (Bhojpuri Bawaal)
भोजपुरी इंडस्ट्रिच्या इतिहासात पहिल्यांदाच भोजपुरी बवाल असा भव्य रिअॅलिटी शो येत आहे. हा शो २ ऑगस्ट रोजी कलर्स आणि जिओ-हॉटस्टारवर चाहत्यांना पाहता येणार आहे. आ शोचे सूत्रसंचालन मनीषा राणी आणि कृष्णा अभिषेक हे करणार आहेत. या शोमध्ये स्पर्धक म्हणून पवन सिंग, दिनेश लाल यादव 'निरहुआ', आम्रपाली दुबे आणि काजल राघवानी यांच्यासोबतच तेज प्रताप यादव यांचाही सहभाग असेल.
प्लेग्राउंड सीझन ५ (Playground Season 5)
देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग रिअॅलिटी शो 'प्लेग्राउंड'चा ५ वा सीझन येत आहे. हा शो १ ऑगस्ट पासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयर (Amazon MX Player) वर पाहता येईल. या शोमध्ये तीन मेंटर्स असतील. यात एल्विश यादव, तेजस्वी प्रकाश आणि आरुष भोला मार्गदर्शन करतील. यात गेमिंग टास्क, चुरस आणि ड्रामा यांचा उत्तम संगम पाहायला मिळेल.
एमटीव्ही हसल सीझन ५ (MTV Hustle Season 5)
देशातील सर्वात मोठ्या हिप-हॉप आणि रॅप रिअॅलिटी शो म्हणजेच एमटीव्ही हसलचा पाचवा सीझन ८ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. अंडरग्राउंड रॅपर्स आणि नवीन कलाकार पुन्हा एकदा मंचावर धम्माल उडवायला आणि प्रेक्षकांना थिरकायला लावायला सज्ज झाले आहेत. हा शो एमटीव्ही आणि जिओ-हॉटस्टारवर पाहता येणार आहे. याचे सूत्रसंचालन लोकप्रिय रॅपर आणि परीक्षक बादशाह करत आहेत.
द ट्रेटर्स २ (The Traitors 2)
द ट्रेटर्स २ या शोमध्ये मल्लिका शेरावत दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मुनव्वर फारुकी आणि पूर्वा झा यांची झलकही पाहायला मिळाली. हा शो १३ ऑगस्ट रोजीपासून प्रदर्शित होणार असून ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. याचे सुत्रसंचालन करण जोहर जोहर करणार असून उर्फी जावेद, अपूर्वा मुखिजा आणि एल्नाझ नोरौझी यांचा स्पर्धक म्हणून सहभाग असेल. तसेच मालिकेत आणखी काही नवीन स्पर्धकही सहभागी होणार असून, त्यांच्याबद्दलची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.














