
सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ आयोजित 59 व्या युवा महोत्सव अंतिम फेरीत स्वरवाद्य हार्मोनियम मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) चा विद्यार्थी मंगेश रामचंद्र मेस्त्री याने कांस्यपदक मिळविले..
त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल भारमल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
त्याच्या यशासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. एस एम बुवा व सहकारी सदस्य डॉ. डी.जी बोर्डे,डॉ. एस. ए.देशमुख, प्रा.राहुल शेवाळे, डॉ. वाय ए पवार, प्रा. हर्षदा परब, निकिता वर्दम यांचे सहकार्य लाभले.










