LIVE UPDATES

ICC Rankings India : आयसीसी क्रमवारीत भारताचा दबदबा, 'हे' 16 खेळाडू 'टॉप 10' मध्ये

Latest ICC Rankings : भारताने एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे, त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूंनीही आपापल्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन यादीत शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू दोन वेगवेगळ्या आयसीसी क्रमवारींमध्ये 'टॉप-१०' मध्ये आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 24, 2026 13:55 PM
views 98  views
ICC Rankings India Indian cricket team players

नवी दिल्ली : आयसीसीने नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी 20 या दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तर भारतीय खेळाडूंचे वैयक्तिक क्रमवारीतही विविध प्रकारांमध्ये वर्चस्व दिसून येत आहे. भारतीय संघातील १६ खेळाडू विविध प्रकारांमधील 'टॉप-१०' खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवून आहेत.

ज्याप्रमाणे भारताने एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे, त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूंनीही आपापल्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन यादीत शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू दोन वेगवेगळ्या आयसीसी क्रमवारींमध्ये 'टॉप-१०' मध्ये आहेत

आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कर्णधार शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे. तर त्याच्यासोबत विराट कोहली तिसऱ्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोहली आणि रोहित या दोघांचीही नजर पहिल्या स्थानावर असेल.

एकदिवसीय ऑल राऊंडर खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजाचे अव्वल स्थान कायम आहे. वॉशिंग्टन सुंदर कसोटी ऑल राऊंडर खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. अक्षर पटेल नवव्या स्थानावर आहे, तर गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादव याच स्थानावर आहे.

भारतीय संघाच्या कसोटी क्रमवारीमध्ये संघ चौथ्या स्थानावर आहे. तर वैयक्तिक खेळाडूंच्या क्रमवारीत ऋषभ पंत आणि कर्णधार शुभमन गिल हे फलंदाजी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहेत. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय खेळाडू असून तो चौथ्या स्थानावर आहे. 

भारत आयसीसी टी 20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रकारातील खेळाडूंच्या क्रमवारीत, अव्वल १० खेळाडूंमध्ये सहा भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. टी 20 फलंदाजी क्रमवारीत इशान किशन पहिल्या स्थानावर आहे, तर अभिषेक दुसऱ्या स्थानावर आहे. नवव्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे.

ऑल राऊंडर खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावर आहे, तर टी 20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्ती सातव्या आणि जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर आहे.