
सावंतवाडी : मोती तलाव परिसरात आज सायंकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीत अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत पोहचली आहे. अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुन्या मुंबई - गोवा महामार्गावर हा अपघात झाला. चारचाकी (एम.एच. 01 सीएच 6280) व दुचाकी ( एम. एच. 07 एव्ही. 5873) त ही धडक बसली. यात दुचाकीस्वार मिथिल भिसे (वय 30 ) हा रस्त्याकडेला रस्त्याकडेला फेकला गेला. या अपघात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीसह चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.










