
मुंबई : नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी निधन झाले. संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाली असून अनेकजण सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. जरी त्यांचे निधन गोव्यात झाले असले, तरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर केले जातील अशी माहिती नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी याबाबत माहिती दिली.
नाना पाटेकर यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार केले जातील. नानांच्या 'नाम फाउंडेशन'चे (Naam Foundation) सीईओ गणेश थोरात यांनी दुजोरा दिला की, गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्यात आणले जाईल. त्यानंतर चाहत्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर फार्महाऊसवरच अंत्यविधी पार पडेल. नानांचे फार्महाऊस पुणे शहराच्या उपनगरातील 'डोणजे' परिसरात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना कुटुंबाला कळवले की, शासनाकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली जात आहे.
वडिलांच्या निधनाची माहिती देताना मल्हार यांनी सांगितले की, नाना घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे (कार्डियाक अरेस्ट) त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.














