
मुंबई : अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर सुरुवात केल्यानंतर आपला कमाईचा धडाका कायम ठेवला आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. वीकेंडला दमदार कमाई केल्यानंतर सोमवारीही (चौथ्या दिवशी) चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील जलवा कायम राहिला. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग
‘दृश्यम ३’ने पहिल्याच दिवशी ६२ कोटी रुपयांचे शानदार कलेक्शन करत अजय देवगणच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५३.५० कोटी, तर तिसऱ्या दिवशी (रविवार) कमाईत पुन्हा मोठी वाढ होऊन चित्रपटगृहांनी ६१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
चौथ्या दिवशीही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
सोमवारी, चौथ्या दिवशीही प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम राहिला. देशभरात सुमारे १६,२७४ शोद्वारे चित्रपटाची प्रेक्षक उपस्थिती २५ टक्क्यांच्या आसपास राहिली. यासह चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई १९७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
थ्रिलर कथानक आणि जबरदस्त स्टारकास्टमुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत असून, आगामी दिवसांत हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज चित्रपट विश्लेषक व्यक्त करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










