LIVE UPDATES

नडगिवे घरफोडीत 10 हजाराची रोकड चोरीस

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2026 21:15 PM
views 9  views

कणकवली : मंगळवारी पहाटे चोरट्यानी नडगीवे धुरीभाटलेवाडी येथे सहा बंद बंगले फोडून चोरयांचा प्रयत्न केला होता. त्यापैकी संदीप मांजरेकर यांच्या बंगल्यातील दहा हजाराची रोकड व व एक सोन्याचे पेंडल  चोरट्यानी चोरून नेले, या व्यतिरिक्त अन्य काही चोरीस गेल्याचे दिसून आलेले नाही. दरम्यान चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्हीत दिसत असल्याने या चोरट्यांचा माग पोलीस लवकरच काढतील असा विश्वास पोलिसांना आहे.

खारेपाटण नजीक नडगिवे -शेरपे  मार्गावर चोरट्यानी सहा बंगल्याना लक्ष्य करत मंगळवारी पहाटेच्या सुमारास बंगल्यांच्या दरवाजांचे कडीकोयंडे तोडून चोऱ्यांचा प्रयत्न केला होता ,यातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते मात्र बंगले बंद असल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. केवळ एका घरातील दहा हजाराची रोकड आणि एक सोन्याचा किरकोळ दागिना चोरीस गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक तपास एलसीबी पोलीस  उपनिरीक्षक अनिल हाडळ ,खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार मिलिंद देसाई करत आहेत.