कोलगावात महिलेची आत्महत्या

Edited by: विनायक गांवस
Published on: August 21, 2025 21:50 PM
views 63  views

सावंतवाडी : कोलगाव येथे घरात गळफास लावून अपर्णा कदम (वय ४०) हिने आत्महत्या केली आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तीन आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.