LIVE UPDATES

वैभववाडीत दुचाकी चोरी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 24, 2026 19:51 PM
views 255  views

वैभववाडी : शहरात दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली असून हिर्लेकर दवाखाना परिसरात अज्ञात चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बलभीम गोरे यांच्या मालकीची (क्र. एमएच २५ एआर-२३४२) दुचाकी रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्याचवेळी परिसरातील काही बंद घरांचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

दरम्यान, चोरट्यांनी आणखी एक दुचाकी चोरली होती. मात्र ती सांगुळवाडी मार्गावर काही अंतरावर सोडून दिलेल्या अवस्थेत आढळून आली. गोरे यांची दुचाकी मात्र अद्याप मिळालेली नाही.या प्रकरणी श्री. गोरे यांनी सोमवारी (ता.२३) सायंकाळी उशिरा वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.