LIVE UPDATES

सावंतवाडीत दोन दुचाकींची चोरी ; गुन्हा दाखल

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 12:34 PM
views 257  views

सावंतवाडी :  शहर आणि कोलगाव परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ७ या कालावधीत या चोऱ्या झाल्या असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, जुना शिरोडा नाका येथील रहिवासी जमाल खान यांची निळ्या-काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो (MH 07 V 0235) आणि कोलगाव-धुरीटेम येथील दया दाभोलकर यांची काळ्या रंगाची हिरो शाईन (MH 07 Z 1022) या दोन गाड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या चोरीबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सध्या शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करत आहेत.