LIVE UPDATES

दोन सराईत चोरट्यांना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2026 20:24 PM
views 178  views

सावंतवाडी : शहरात चोरी करणाऱ्या दोन सराईत संशयित आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर  सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील आणि त्यांच्या पथकाने यासाठी मेहनत घेतली.

राजपूत संतराम पाल (५२, रा. भाईंदर पूर्व, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि राहुल उर्फ दिवानसिंग ओमप्रकाश तोमर (३६, रा. भाईंदर पूर्व, मूळ रा. मथुरा, उत्तर प्रदेश) या दोन आरोपींना पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले. या आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी चोरी केलेले साहित्य हस्तगत करणे, चोरी करण्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करणे तसेच या दोघांचा अन्य काही गुन्ह्यांमध्ये किंवा ठिकाणच्या चोऱ्यांमध्ये सहभाग आहे का ? याचा सखोल तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.