LIVE UPDATES

विनापरवाना जनावरांची वाहतूक महागात

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2026 21:15 PM
views 191  views

सावंतवाडी : सातोळी तिठा येथे तीन गाय, एक वासरू आणि तीन बैल असे दोन्ही वाहनात मिळून ७ प्राणी विनापरवाना राजापूर ते कर्नाटक अशी वाहतूक करताना आढळून आल्याने वाहने जप्त करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

यात आरोपी नागराज रामन्ना जैन वय 42 वर्षे, रामचंद्र नारायण सिद्धी वय 43 वर्षे दोन्ही राह. यल्लापूर, जि. उत्तर कन्नड राज्य कर्नाटक, अजित नारायण धवन वय 37 वर्षे राह.न्हावेली चौकेकर वाडी ता. सावंतवाडी, प्रकाश बाळा कोरगावकर व 71 वर्षे राह. माळगाव कुंभार्ली रस्तावाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. यांच्यावर कारवाई करण्यात आली. तीन गाय, एक वासरू आणि तीन बैल असे दोन्हीं वाहनात मिळून ७ प्राणी विनापरवाना राजापूर ते कर्नाटक अशी वाहतूक करताना मिळून आल्याने वाहने जप्त करण्यात आली.

सर्व गाय,बैल, वासरू यांना सुरक्षित गोशाळेत ठेवण्यात आले आहे.  ट्रॅफिक पोलिस जमादार श्री. आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करीत आहेत.