LIVE UPDATES

आजाराला कंटाळून स्वतःला संपवलं

Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 18:40 PM
views 84  views

सावंतवाडी : जाधववाडी येथील रहिवासी नारायण तुकाराम जाधव (वय ७८) यांनी हृदयरोग आणि मधुमेह या व्याधींना कंटाळून मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण जाधव हे गेल्या काही काळापासून हृदयविकार आणि मधुमेहाने त्रस्त होते. या आजारांमुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. आज सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना त्यांनी घरातील लोट्यावरील छपराच्या वासाला गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती सद्गुरु कृष्णा जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली, तर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोंदा दूरक्षेत्राचे एएसआय अरवारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.