
कणकवली : ग्रामपंचायत सावडाव येथे माहिती अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून सावडाव येथील नयना वैभव सावंत (46) यांच्या घरासमोर उभी असलेल्या अल्टो कारची पुढील काच फोडून सहा हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सावडाव येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नयना सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन संशयीत दत्ताराम मनोहर काटे, व्यंकटेश हरी वारंग, दिनेश तुकाराम नेवरेकर, (सर्व रा.सावडाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत घडली. 9 जून रोजी नयना सावंत यांनी माहिती अधिकारात माहिती ग्रामपंचायतीकडे माहिती मागवली होती. त्या रागातून हा प्रकार घडल्याचे नयना सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार श्री.धारकर करत आहेत.













