LIVE UPDATES

जामसंडेत बंद घरांना चोरट्यांचे लक्ष्य

तीन घरफोड्यांच्या घटनांनी खळबळ | पितळी भांडी, चांदीची नाणी, नळ आणि वायरिंगची बंडले लंपास
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 22, 2026 07:31 PM
views 152  views

देवगड :  देवगड-जामसंडे शहरात बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, गेल्या काही दिवसांत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरातील नळ, पुरातन पितळी भांडी, चांदीची नाणी, देवघरातील चांदीची पूजेची भांडी तसेच इलेक्ट्रिक वायरिंगची बंडले असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरात चोरट्यांचा वाढता वावर आणि बंद घरे फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांप्रकरणी संबंधितांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री सायरन वाजवत शहरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

देवगड-जामसंडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांची रेकी करून चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. जामसंडे शिळोम येथील प्रसाद मोंडकर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील नळ, पुरातन पितळी भांडी, चांदीची नाणी तसेच देवघरातील चांदीची पूजेची भांडी असा ऐवज चोरून नेला.

या घटनेनंतर काही दिवसांतच जामसंडे आझादनगर परिसरातही घरफोडीचे प्रकार घडले. येथील विजय भास्कर घाडी यांच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून इलेक्ट्रिक वायरिंगची बंडले लंपास केली. घराचा पुढील आणि मागील दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घाडी यांना दूरध्वनी करून याबाबत माहिती दिली. घाडी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच परिसरातील आणखी एका बंद घरातही चोरट्यांनी चोरी केली असून, तेथील नळ लंपास केले आहेत. या घटनांप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला असल्याची माहिती विजय घाडी यांनी दिली.

दरम्यान, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत देवगड पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवर भर दिला आहे. मध्यरात्री सायरन वाजवत शहरात गस्त घालण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रात्री सायरनचा आवाज ऐकून नागरिक सतर्क होतील. तसेच पोलीस आपल्या परिसरातून गस्त घालत असल्याची जाणीव नागरिकांना होऊन संभाव्य चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी दिली.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी
November 23, 2026
Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित
November 23, 2026
‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Malvan News : रेवतळेत गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : रस्ता कामासाठीच्या मशीनचे ६५ लाखांचे पार्ट चोरीस
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
November 23, 2026