LIVE UPDATES

Kankavli News : रस्ता कामासाठीच्या मशीनचे ६५ लाखांचे पार्ट चोरीस

देवगड-निपाणी मार्गावरील फोंडाघाट-बौद्धवाडीतील प्रकार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 10:47 AM
views 149  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : देवगड-निपाणी रस्त्याच्या कामासाठी वापरली जाणाºया मशीनचे तब्बल ६५ लाख किंमतीचे पार्ट अज्ञात चोरट्यांनी चोरले. हा प्रकार फोंडाघाट-बौद्धवाडी परिसरात रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे.

देवगड-निपाणी रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या एका कंपनीकडून रस्त्याचे केले जात आहे. फोंडाघाट-बौद्धवाडी परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून याठिकाणी वाहनाने शनिवारी दुपारी रस्ता तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन आणण्यात आली होती.

ही मशीन चोरीस जाऊ नये याकरिता शनिवारी सुरक्षिततेसाठी मंडळी तैनात ठेवण्यात आली होती. या मंडळींची डयुटी संपल्याने ही मंडळी निघून गेली. चोरट्यांनी ही संधी साधून मशीनमधील ६५ लाख किमतीचे पार्ट चोरून नेले. मशीन सुरक्षितेतसाठी येणारी पर्यायी मंडळी दाखल झाल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांची घडलेल्या प्रकाराची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला दिली.

त्यानंतर व्यवस्थापन मंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी मशीनमधील पार्ट चोरीस गेल्याचे त्यांनी दिसून आले. यानंतर कंपनीची व्यवस्थापक मंडळी रविवारी कणकवली पोलीस दाखल झाली होती. त्यांच्याकडून चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरट्याविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी
November 23, 2026
Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित
November 23, 2026
‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Malvan News : रेवतळेत गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
November 23, 2026
जामसंडेत बंद घरांना चोरट्यांचे लक्ष्य
November 22, 2026