LIVE UPDATES

Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित

प्रा. डॉ. अपर्ण अशोक घाडी हरकुळ खुर्द गावच्‍या कन्‍या
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 05:52 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : मालाड – मुंबई येथील घनश्यामदास जालान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख तसेच कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावच्या कन्या प्रा. डॉ. अपर्णा अशोक घाडी यांचा पक्षी वैविध्यावरील संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालाआहे.

हा लेख International Journal for Multidisciplinary Research (IJFMR) या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या खंड ८, अंक ६ (नोव्हेंबर-डिसेंबर २०२६) मध्ये प्रकाशित झाला आहे. 

अपर्णा यांच्‍या या संशोधनामध्ये मुंबईतील आरे कॉलनी, गोरेगाव येथील मॉडर्न बेकरी परिसरातील पक्ष्यांच्या विविधतेची नोंद व सूची सादर करण्यात आली आहे. शहरी आणि निमशहरी परिसरातील पक्षीवैविध्याचे महत्व व जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीने हा संशोधनपर लेख महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्‍वास 'आयजेएफएमआर' या नियतकालिकाने व्‍यक्‍त केला आहे. 

या संशोधनात डॉ. अपर्णा घाडी यांच्यासह प्रा. डॉ. विशाल गायकवाड, अनुराग मिस्त्री, अभिजीत गायकवाड आणि साहिल गुप्ता हे सहलेखक म्हणून सहभागी आहेत.

अपर्णा यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हरकुळ खुर्द येथेच झाले. पुढील एम शएस्‍सीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. 'सागरी विज्ञान' (Oceanography) या विषयातून त्‍यांनी एमएस्‍सी केले.

२०२४ साली त्यांना मुंबई विद्‍यापीठाने पीएचडी प्रदान केली. विशेष म्‍हणजे पीएचडीसाठी अपर्णा यांनी आपल्‍याच हरकुळ खुर्द गावातील तलावाचा विषय निवडला होता. 'हरकुळ खुर्द तलावाचा पर्यावरणीय आणि शास्‍त्रीय दृष्‍टीकोनातून महत्‍वपूर्ण अभ्‍यास' हे त्‍यांच्‍या विषयाचे नाव होते. तर अनेक संशोधन प्रक्रियांमध्‍ये अपर्णा यांचा सहभाग राहीला आहे. नुकत्‍याच झालेल्‍या या संशोधनपर लेखाच्या प्रकाशनाबद्दल डॉ. अपर्णा घाडी व त्यांच्या संपूर्ण संशोधन टीमचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


ताजी बातमी

View all

Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
‘पंचायत धरोहर’ उपक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती
November 23, 2026
मुळदे ग्रामपंचायतीचा महाराजस्व अभियान उपक्रम स्तुत्य : तहसीलदार सचिन पाटील
November 23, 2026
नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

मुळदे ग्रामपंचायतीचा महाराजस्व अभियान उपक्रम स्तुत्य : तहसीलदार सचिन पाटील
November 23, 2026
नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026
ओरोस येथे उद्या गिरणी कामगारांची सभा
November 23, 2026
मासळीच्या पाण्यामुळे देवगडच्या रस्त्यांवर अपघातांचा धोका
November 23, 2026