
मालवण : शहरातील रेवतळे येथे अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५८ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई रविवार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी विलास गणपत मुणगेकर (रा. रेवतळे, ता. मालवण) यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल हुंबे आणि हेड कॉन्स्टेबल पेडणेकर यांचा समावेश होता.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








