LIVE UPDATES

डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी

ओंकार हत्ती पकड मोहिमेवरून उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा सल्ला; हत्ती उपद्रवामुळे दोडामार्गमधील शेती संकटात
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 06:06 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शेती आणि बागायती क्षेत्राला गेल्या काही वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसत आहे. हत्तींसह अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत ओंकार हत्तीला पकडून वनतारा येथे हलविण्याच्या मोहिमेवरून पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रत्यक्ष हत्तीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात, असा सल्ला उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी दिला आहे.

डॉक्टर समाजाला मिळतील, पण शेतकरी पुन्हा तयार होणार नाहीत 

गवस म्हणाले की, एकवेळ समाजाला डॉक्टर मिळतील; मात्र शेतीच संपुष्टात आली तर पुन्हा शेतकरी तयार करणे सोपे नाही. शेतीला कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणून कितीही नुकसानभरपाई दिली तरी एका बागायतीची निर्मिती होण्यासाठी लागणारा कालावधी, शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यामागील मेहनत भरून निघू शकत नाही. त्यामुळे केवळ नुकसानभरपाई देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. शेती टिकविण्यासाठी वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

अभ्यासाच्या बाता नकोत, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर या

डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी हत्ती आणि वन्यप्राण्यांबाबत प्रसारमाध्यमांतून आपले ज्ञान मांडण्यापेक्षा एकदा दोडामार्गमधील हत्तीग्रस्त गावांना भेट द्यावी. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे नुकसान, त्यांची व्यथा आणि रोजच्या जगण्यातील संघर्ष समजून घ्यावा. वनविभागासोबत समन्वय साधून दोडामार्ग तालुका हत्तींच्या उपद्रवातून मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करावेत. केवळ चर्चेतून प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी जमिनीवर उतरून काम करावे लागेल, असे गवस यांनी स्पष्ट केले.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने शेती उद्ध्वस्त

दोडामार्गमधील शेती आज गंभीर संकटातून जात आहे. जिल्ह्यातील तसेच लगतच्या कर्नाटक राज्यातील काही भागांत पकडण्यात आलेले रानगवे, माकडे, कोल्हे, बिबटे आदी वन्यप्राणी तिलारी परिसरात आणि कर्नाटक सीमेलगतच्या भागात सोडले जात असल्याने त्यांचा वावर दोडामार्ग तालुक्यात वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. यातील काही वन्यप्राणी पूर्वी कधीही न दिसणाऱ्या भागांतही दिसू लागले आहेत. परिणामी भातशेती, फळबागा आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकरी वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त होत असल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ओंकार हत्तीच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा हत्ती उपद्रवाचा प्रश्न सोडवा

ओंकार हत्तीला वनतारा येथे नेण्याच्या निर्णयावर आक्षेप घेण्यापेक्षा दोडामार्गमधील हत्ती उपद्रवाचा मूळ प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. दोडामार्ग हा हत्तींचा नैसर्गिक अधिवास नसून कर्नाटकातील जंगल परिसर हा त्यांचा अधिवास असल्याची भूमिका गवस यांनी मांडली. त्यामुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने योग्य ठिकाणी त्यांना हलविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ओंकार हत्ती आणि अन्य हत्तींच्या प्रश्नावर केवळ मतप्रदर्शन न करता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजनांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रावीण्य शेतीत दाखवा

डॉ. जयेंद्र परुळेकर हे वैद्यकीय क्षेत्रात प्रवीण आहेत. त्यांनी एकदा दोडामार्गमधील शेती क्षेत्रातही आपली प्रवीणता दाखवावी. प्रत्यक्ष शेती करावी, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे अनुभवावे. शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या शेती-बागायतींचे नुकसान काय असते, याची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातूनच होऊ शकते, असे गवस यांनी नमूद केले.

काँक्रीटच्या जंगलातून शेतकऱ्यांना ज्ञान देणे हास्यास्पद

प्रत्येकवेळी हत्ती पकड मोहिमेला पर्यावरणप्रेमींकडून विरोध केला जातो. मात्र, काँक्रीटच्या जंगलात राहून शेतीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना उपदेश करणे योग्य नाही. पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचेच आहे; परंतु त्याचबरोबर शेतकरी आणि त्यांची उपजीविका टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण आणि मानवी जीवन यांच्यात समतोल राखताना प्रत्यक्ष त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव न ठेवता केवळ मोहिमेला विरोध करणे हास्यास्पद आहे, अशी टीका उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी केली.




ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पालकमंत्री नितेश राणेंना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण
November 23, 2026
NSE and BSE stock markets to remain closed on November 24, 2026, for Guru Nanak Jayanti.
Stock Market Holiday : गुरुनानक जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद, बाजार पुन्हा कधी उघडणार? वाचा सविस्तर
November 23, 2026
Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पालकमंत्री नितेश राणेंना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित
November 23, 2026
मुळदे ग्रामपंचायतीचा महाराजस्व अभियान उपक्रम स्तुत्य : तहसीलदार सचिन पाटील
November 23, 2026
नांदगाव येथे २६ व २७ नोव्हेंबरला ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
November 23, 2026