LIVE UPDATES

सावंतवाडी शहरातील तीन बंद बंगले चोरट्यांनी फोडले

सावंतवाडी पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल : बंद असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा समोर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 14:13 PM
views 224  views

सावंतवाडी : शहराच्या सीमेवरील टेलिफोन कॉलनीत तीन बंगले चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री हा प्रकार घडला. यातील काही बंगले हे बंद असल्याने त्याचा फायदा घेत फोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, फोडलेल्या एका घरातील फोन, लॅपटॉप चोरीस गेले असून बेडरूमधील कपाटे फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. तर काही घरांमधून दागिने लंपास केले आहेत. या घरफोडीत २ दुचाकीही चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून बंद असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे पोलीसांना चोरांचा सुगावा लावण्यात मोठी अडचण येत असून प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देत तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.