LIVE UPDATES

कोचर्‍यात २६ ऑगस्टला भव्य नारळ लढवणे स्पर्धा

विष्णू (आप्पा) विठ्ठल फणसेकर मित्रमंडळ यांचे सौजन्य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 17, 2026 17:15 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : श्री देवी भराडी मित्रमंडळ, कोचरा यांच्या वतीने बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता कोचरा येथील शेळपी विठा येथे भव्य नारळ लढवायची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला ‘श्री विष्णू (आपा) विठ्ठल फणसेकर मित्रमंडळ पुरस्कृत’ करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांसह ट्रॉफी देण्यात येणार आहे.

 नारळ लढवायची पारंपरिक स्पर्धा ही कोकणातील एक लोकप्रिय लोककला व मनोरंजनाचा प्रकार असून, या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक परंपरा, उत्साह आणि ग्रामस्थांमधील एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे.

 स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला १० हजार २६ रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाला ५ हजार २६ रुपये व ट्रॉफी, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी १ हजार २६ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणाऱ्या संघांसाठीही विशेष भेटवस्तू ठेवण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक आकर्षक बक्षिसे व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क केवळ २५० रुपये ठेवण्यात आले असून, नारळ लढवायच्या या रंगतदार स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धकांनी व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी हर्षद हंजणकर (९४२१९०९९३०), पंकज राऊळ (९४२१० ७९०७१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.