
वेंगुर्ला : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी असून असून यानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या १८ ऑगस्ट रोजी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप तसेच उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र यांना पंखा वाटप व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वृक्षावाटप व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी दिली आहे. तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.










