LIVE UPDATES

मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष

निवृत्त व्यक्तीच्या खात्यातून केले 1 लाख 93 हजार 500 गायब
Edited by: लवू परब
Published on: June 02, 2026 19:12 PM
views 31  views

दोडामार्ग : मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याने दोडामार्ग येथील एका निवृत्त नागरिकाच्या बँक खात्यांमधून तब्बल १ लाख ९३ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

        गुरुदास गोपाळ मनेरिकर (६३, रा. धाटवाडी, दोडामार्ग) यांना २३ मार्च २०२६ रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने मोबाईल रिचार्जचे १,४९९ रुपये परत मिळणार असल्याचे सांगून मोबाईलवर काही प्रक्रिया करण्यास सांगितले. त्याच्या सूचनांनुसार मणेरिकर यांनी मोबाईलद्वारे आवश्यक माहिती भरली. मात्र, काही वेळातच त्यांच्या एका बँक खात्यातून ९५ हजार रुपये आणि दुसऱ्या बँक खात्यातून ९८ हजार ५०० रुपये अशा एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपयांची रक्कम ऑनलाइन व्यवहाराद्वारे अज्ञात खात्यात वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत मला दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करत आहेत.