बस प्रवासात चोरी केलेल्या गुन्हयाची उकल

13 लाखांचे दागिने हस्तगत
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 10, 2026 14:44 PM
views 200  views

कुडाळ :  20 जानेवारी रोजी सुहासिनी रमाकांत पाटकर (वय 64 वर्षे, रा. वायरी भुतनाथ ता. मालवण) हया मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन असा एस टी बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरुन नेलेली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व या चोरीचा तपास  कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत सुरु होता.

     गुन्हयातील अज्ञात आरोपीत याने फिर्यादी यांचे मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन या दरम्याने 13 लाख रुपये किंमतिचे दागिने असलेली बॅग चोरुन नेलेली होती. अज्ञात आरोपीत याचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसां समोर मोठे आव्हान होते. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गुन्हा उघडकीस आणण्या करीता स्वतंत्र पोलीस पथक स्थापण केलेले होते. नमुद गुन्हयाचा तपास कुडाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरु होता. नमुद गुन्हयाचे तपासात पोलीसांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे नमुद गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेवुन गुन्हयात आरोपी मंगेश नाथुभाई नटु, (वय 55 वर्षे रा. कोकरे आगार, सायन कोळीवाडा, अॅटॉप हिल मुंबई) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो फौजदार हडळ यांनी अटक करुन ताब्यात घेतले व पुढील तपासाकरीता कुडाळ पोलीस ठाण्यात हजर केला होता. 

कुडाळ पोलीसांनी नमुद आरोपीची पोलीस कोटडी रिमांड घेवुन आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने मुंबई येथे दागिने ठेवल्याचे सांगितल्याने कुडाळ पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस पथक आरोपीसह मुंबई या ठिकाणी जावुन आरोपीने लपवुन ठेवलेले सोन्याचे 13 लाख रुपये किंमतिचे सोन्याचे दागिने व 6000/- रु रोख रक्कम हस्तगत केली.

 कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सपोनि जयदीप पाटील, पो. फौजदार सावर्डे, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, हरेश पाटील, सुबोध मळगांवकर, सुप्रिया भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, पो. फौजदार हडळ, पोलीस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई, जॅक्सन घोन्सालवीस, ज्ञानेश्वर तवटे, महेश समजीस्कर, धनश्री परब, युवराज भंडारी यांनी केलेली आहे.