अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघायचा शिक्षक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 25, 2025 21:00 PM
views 277  views

कणकवली : तालुक्यातील एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघण्याचे कृत्य केले. हा प्रकार बुधवार, १३ ऑगस्ट रोजी त्या हायस्कूलमध्येच घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्या शिक्षकावर बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

त्या शिक्षकाने विद्यार्थिनींना वारंवार चोरून बघण्याचे कृत्य केले. पीडितांनी घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी कणकवली पोलीस ठाण्यात त्या शिक्षकाच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर भरोसा सेलच्या अधिकारी नलिनी शिंदे व पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी पीडित व तिच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला.