LIVE UPDATES

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी संशयितास जामीन

ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांचा युक्तिवाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 08, 2026 22:10 PM
views 395  views

कणकवली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक व पोलीस कोठडीत रवानगी झालेला संशयित पराग सुहास वळंजू (रा. देवगड) याला विशेष सत्र न्यायाधीश व रोज यांनी ५० हजाराचा सशरथ जामीन मंजूर केलं संशयिताच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड.प्रसाद सावंत यांनी काम पाहिले. 

घटना अशी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. चे मानाने फिर्यादी यांचे पतीने पिडीत अल्पवयीन मूलगी हिला तिच्या कुडाळ येथील मैत्रीणीच्या घरी अभ्यासाकरीता नेऊन सोडलेले होते. परंतु ती परत घरी न आल्याने मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असून सुध्दा कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले, म्हणून यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होता. गतपासादरम्याने पिडीत अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी हे दिनांक २२ फेब्रुवारीला फोंडा (ता. कणकवली) येथे मिळून आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेवून कुडाळ पोलीस ठाणे येथे आणुन पिडीत मुलीकडे चौकशी केली असता, आरोपी हा तिला कुडाळ येथे भेटण्याकरीता आला. त्यानंतर आरोपीत याने पिडीत अल्पवयीन मुलगी हिला आपण कोठेतरी लांब फिरायला जावुयात असे सांगुन तिला कणकवली बस स्टॅण्ड येथे घेवुन गेला. पुढे एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. पुढे त्याने मुलीला गोवा येथे नेऊन हाच प्रकार केला होता.