LIVE UPDATES

तालुक्यातील क्वारीवर सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण ?

व्हिडिओ व्हायरल
Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 09:17 AM
views 1396  views

सावंतवाडी : तालुक्यातील एका क्वारीवर  सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण होत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आपल्या खाजगी हद्दीत प्रवेश का केला ? असा सवाल करत संबंधित सामाजिक कार्यकर्त्यास जाब विचारल्याचे दिसत आहे. गाडीतील एका सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काल तालुक्यातील एका हायवे शेजारील गावात हा प्रकार झाल्याचे समजते. महसूल विभाग तपासणीसाठी या क्वारीवर गेले असताना दोन सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्याची माहिती मिळते. यावेळी आपल्या खाजगी हद्दीत तुम्ही का आलात ? असा सवाल करताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओत गाडीतील एका व्यक्तीला काहीजण मारहाण करताना दिसून येत असून एक जण दगड उचलताना दिसत आहे. तर हा वाद सोडविताना लोकप्रतिनिधी देखील व्हिडिओत दिसत आहे. याबाबत संबंधित सामाजिक कार्यकर्त्याकडून सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.