
कणकवली : सध्या दुष्काळामुळे वनराई बंधारे बांधणे, बंधाऱ्यांना लोखंडी प्लेटस् बसविणे अशी कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे-किनवणेवाडी येथील बंधाऱ्यासाठी ठेवण्यात आलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या १५३ लोखंडी प्लेटस् अज्ञाताने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या घटनेबाबत लघुपाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता तथा नरडवे प्रकल्प उपविभाग आंबडपाल या कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता एदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारेविशाल तुकाराम सामंत (४३) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दिगवळे-किनवणेवाडी येथे पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी व सोडण्यासाठी बंधाऱ्यावर लोखंडी प्लेटस्चा वापर केला जातो. सदरच्या लोखंडी प्लेटस् पावसाळ्यापूर्वी काढून त्या तेथील शेडमध्ये उघड्यावर एकत्र ठेवण्यात आल्या होत्या. सदरच्या प्लेटस् बसवण्याचे काम घेतलेल्या संस्थेचे प्रतिनिधी नवनाथ पवार हे शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास बंधाऱ्याच्या ठिकाणी गेले असता तेथे लोखंडी प्लेटस् नसल्याचे दिसून आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








