
सावंतवाडी : साटेली येथील तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याबर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक संशयित आरोपीत अभिजीत कांबळी (रा. सावंतवाडी ) याला मे. जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीचे वतीने वतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.
आरोपीने पिडीतेशी लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर गोवा, कुडाळ, सावंतवाडी अशा विविध ठिकाणी पिडीतेला फिरवून संशयिताने पिडीतेसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. त्यानंतर पिडीतेसोबत लग्न करण्यास नकार दिला होता व पिडीतेची फसवणूक केली होती. प्रकारामुळे संबंधित पिडीतेने आरोपीत विरुध्द भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम ६९ अंतर्गत सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे दि. ०१/०६/२०२६ रोजी फिर्याद दाखल केली होती. सावंतवाडी पोलीसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली होती. तथापि या प्रकरणाचे जामीन अर्जावर मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेश करत आरोपीचा सकृत दर्शनी दोष दिसून येत नसल्याने आरोपीला रक्कम रु. १५ हजारांच्या सशर्त जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.














