मुलांच्या आत्महत्येने हादरली सावंतवाडी

सलग दुसऱ्या शहरातील तिसरी आत्महत्या
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 20:43 PM
views 586  views

सावंतवाडी : शहरातील बिरोडकर टेंब परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी त्याच परिसरातील एका युवतीने व त्यानंतर लगेचच एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सावंतवाडी शहर हादरले असून या घटनांमुळे हे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान सावंतवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.