LIVE UPDATES

कुटरे नाक्यावरील पिकअप शेडमध्ये वादातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण

सावर्डे पोलिसांत गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 01:48 PM
views 78  views
Savarde Police register an assault case after a 47-year-old farmer is allegedly attacked with a wooden stick at Kutre Stop in Chiplun.

चिपळूण : तालुक्यातील कुटरे स्टॉप नाक्यावरील पिकअप शेडमध्ये गप्पा मारत बसलेल्या ग्रामस्थांमध्ये किरकोळ संभाषणावरून वाद उफाळून एका शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २६) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बबन होवळे (वय ४७, व्यवसाय-शेती, रा. कुटरे चिंचवाडी, ता. चिपळूण) असे जखमी फिर्यादीचे नाव असून त्यांनी संशयित वैभव विजय शिर्के (रा. कुटरे खालचे आवाड, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता फिर्यादी संतोष होवळे हे साक्षीदार सचिन साळवी, हेमंत चिनकटे आणि संशयित आरोपी वैभव शिर्के यांच्यासोबत कुटरे स्टॉप नाक्यावरील पिकअप शेडमध्ये बसले होते.

यावेळी संशयित आरोपी वैभव शिर्के याने तळवडे येथील गुरव नावाचे गृहस्थ कुटरेकरांबद्दल अपशब्द वापरत असल्याचे उपस्थितांना सांगितले. त्यावर संतोष होवळे यांनी संशयित आरोपीला ‘त्यांना तिथेच जाब विचारायचा होता’ असे म्हटले. या बोलण्यावरून वैभव शिर्के याने ‘तू बोलतोस ते मला पटत नाही’ असे प्रत्युत्तर दिले, ज्यावर होवळे यांनी ‘मग तू मला काही सांगू नकोस’ असे सुनावले.

या संभाषणाचा राग मनात धरून संशयित आरोपी वैभव शिर्के याने संतोष होवळे यांना जोरात ढकलून देत त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली. एवढ्यावरच न थांबता संशयित आरोपीने तेथेच पडलेला लाकडी दांडका उचलून होवळे यांच्या डाव्या कानाच्या पाळीवर जोरदार प्रहार केला. या मारहाणीत होवळे यांच्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. यावेळी तेथे उपस्थित असलेले हेमंत चिनकटे आणि सचिन साळवी यांनी तात्काळ मध्यस्थी करत होवळे यांची झटापटीतून सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संतोष होवळे यांनी सायंकाळी ६.२० वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी वैभव विजय शिर्के याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१) आणि ११५(२) अन्वये गुन्हा (रजि. नं. १६१/२०२६) दाखल केला असून सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal car Accident : ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला
November 27, 2026
Two cars involved in a head-on collision at Bhoste Ghat on Mumbai-Goa Highway, leaving two people injured.
Mumbai Goa Highway Accident : भोस्ते घाटात दोन कारची समोरासमोर धडक
November 27, 2026