
सावंतवाडी : सातार्डा येथील पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्यावतीने आयोजित केलेल्या व जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी त्यांच्या मातोश्री कै. सुमित्रा सोनू कवठणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कृत केलेल्या ' एकपात्री अभिनय ' स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर उत्कर्ष कवठणकर होत्या. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य शर्मिला मांजरेकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, दासू गावित, सातार्डा पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, शिक्षक अमित पिळणकर, माजी पंचायत समिती सदस्या श्रुतिका बागकर, संतोष कांबळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि. प. सदस्य सुदन कवठणकर म्हणाले की,अभिनय स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. स्पर्धांमधून कलाकारांना व्यासपीठ मिळते अशा स्पर्धांचा लाभ घेऊन दशक्रोशीमध्ये अजिंक्यतारे निर्माण व्हावेत. विविध उपक्रम राबविणाऱ्या सातार्डा पंचकोशी टिळक ग्रंथालयाच्या टीमचे कौतुक आहे.
प्रास्ताविक करताना ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर म्हणाले की, एकपात्री अभिनय स्पर्धेतून रंगमंच जीवंत ठेवला जातो. कलाकारांसमोर मोठे आव्हान असते.कलाकारांनी कला जोपासून कलाकारांचा वारसा टिकून ठेवावा. विद्यार्थी जीवनातच कलाकारांना व्यासपीठ मिळावे, कलागुणांना वाव मिळावा यासाठी सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्यावतीने अनेक स्पर्धा सुरू आहेत. डॉ. उत्कर्षां कवठणकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, संतोष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. दशक्रोशी मर्यादित एकपात्री अभिनय स्पर्धेत सात शाळांमधील वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








