LIVE UPDATES

Sindhudurg News : ‘केवळ ओंकार हत्ती नव्हे, संपूर्ण मानव-वन्यजीव संघर्षावर उपाययोजना करा'

हेमंत वागळे यांची मागणी; सिंधुदुर्गात केरळ पॅटर्न राबवण्याची मागणी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 11:54 AM
views 58  views
Human wildlife conflict in Sindhudurg, elephant and gaur attacks on farms, Hemant Wagle demands Kerala Model solutions.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष अत्यंत टोकाला पोहोचला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केरळ राज्याप्रमाणे आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने वन्यजीवांचे नियोजन करण्याची नितांत गरज असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि वनविभाग मूळ प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. उलट, प्रत्येक वेळी विषय भरकटवून शेतकऱ्यांच्या मनात प्राणीमित्रांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असा तीव्र संताप प्राणीप्रेमी हेमंत सत्यवान वागळे यांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान व्हावे असे अजिबात वाटत नाही. नारळ, पोफळी किंवा आंबा-काजूचे एक झाड लावून ते उत्पन्नास येण्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात. आजोबा-पणजोबांच्या काळातील आणि दोन-तीन पिढ्यांना आधार देणाऱ्या बागायती जेव्हा हत्ती किंवा गवेरेडे काही सेकंदात उद्ध्वस्त करतात, तेव्हा शेतकऱ्याला होणाऱ्या यातनांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या या दुःखाशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत.

केवळ 'ओंकार'ला 'वनतारा'मध्ये पाठवणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. सध्या केवळ 'ओंकार' हत्तीच्या स्थलांतरावरून गैरसमज पसरवले जात आहेत. निसर्गनियमानुसार वयात आलेला नर हत्ती कळपापासून वेगळा होऊन भटकत असतो. त्यामुळे त्याला मादी उपलब्ध करून देणे हा शास्त्रीय उपाय नाही.

जर केवळ एका 'ओंकार' हत्तीला 'वनतारा'मध्ये पाठवले, तर जिल्ह्यातील इतर हत्तींचे कळप आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणारे गवेरेडे यांचा बंदोबस्त कायमचा होणार आहे का ? जर फक्त ओंकारला 'वनतारा'मध्ये पाठवल्याने सिंधुदुर्गातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा सुटणार असेल, तर त्यासाठी आमचीही तयारी आहे. मात्र, केवळ एका प्राण्याला लक्ष्य करून आणि प्राणीमित्रांना दोष देऊन मूळ समस्या सुटणार नाही, हे वास्तव आहे.

केरळ राज्याने मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' (RRT), सौर कुंपण, हत्तींचे कॉरिडॉर, एआय (AI) आधारित पूर्वसूचना यंत्रणा आणि त्वरित नुकसान भरपाई यांसारखे अत्यंत प्रभावी आणि शास्त्रीय उपाय राबवले आहेत.

कोकण आणि केरळची भौगोलिक परिस्थिती सारखीच असताना सिंधुदुर्गात हा पॅटर्न का राबवला जात नाही ? प्रशासन आणि राजकीय नेते या गंभीर विषयावर केवळ आपली राजकीय पोळी भाजून दिवस ढकलत आहेत आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठी शेतकरी व प्राणीमित्र यांच्यात फूट पाडत आहेत.

केरळ राज्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गात स्वतंत्र 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' (RRT), आधुनिक ट्रॅकिंग यंत्रणा आणि पूर्वसूचना प्रणाली तात्काळ कार्यान्वित करावी‌. सर्व हत्ती आणि गवेरेड्यांसाठी ठोस कृती आराखडा: केवळ एका हत्तीवर लक्ष केंद्रित न करता जिल्ह्यातील सर्व हत्तींचे कळप आणि गवेरेड्यांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी धोरण राबवावे.

हत्ती आणि गवेरेडे शेताकडे वळू नयेत यासाठी जंगलातच चारा, बांबू लागवड व पाणवठ्यांची निर्मिती करावी आणि हत्तींचे नैसर्गिक मार्ग (कॉरिडॉर) सुरक्षित करावेत. शेतकऱ्यांच्या बागायती वाचवण्यासाठी सौर कुंपण व खोल चरांसाठी शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे आणि नुकसानीची बाजारभावानुसार तात्काळ भरपाई मिळावी.

शेतकरी आणि प्राणीमित्र हे एकमेकांचे शत्रू नाहीत, तर दोघेही निसर्गाचे घटक आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि वनविभागाने विषय भरकटवणे बंद करून केरळ पॅटर्नप्रमाणे ठोस उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
November 28, 2026
MLC Dnyaneshwar Mhatre meets Prajakt Chavan in Kankavli as the new Sindhudurg district executive committee of Shivchhatrapati Teachers Association is announced.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा
November 28, 2026