LIVE UPDATES

'त्‍या' बोगस कामाला जबाबदार असलेल्‍यांवर कारवाई व्‍हायलाच हवी

माजी उपनगराध्‍यक्ष बंडू हर्णेंचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 01:04 PM
views 65  views
BJP corporators in Kankavli demand a structural audit of the Nagar Panchayat hall after part of the renovated stage collapsed.

कणकवली :  कणकवली नगरपंचायत सभागृहाचे नुतनीकरण होऊन काही दिवस झाले नाहीत तोच पहिल्‍याच सभेत स्‍टेजचा काही भाग कोसळल्‍याने भ्रष्‍टाचारमुक्‍त कणकवलीचा नारा, शाश्‍वत विकासाची ग्‍वाही देत सत्तेवर आलेल्‍या कणकवली नगरपंचायतीच्‍या विद्‍यमान सत्ताधार्‍यांचा शाश्‍वत विकास काय आहे हे दिसून आले आहे. न. पं. सभागृहाच्‍या कामाचे स्‍ट्रक्‍चरल ऑडिट झाल्‍याशिवाय आम्‍ही सभागृहात बसणार नाही. सदर बोगस कामाला जबाबदार असलेल्‍या सर्वांवर कारवाई झाल्‍याशिवाय आम्‍ही शांत बसणार नाही, असा इशारा कणकवलीचे माजी उपनगराध्‍यक्ष तथा विद्‍यमान स्‍विकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिला. 

समीर नलावडे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. हर्णे बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, मनस्‍वी ठाणेकर आदी उपस्‍थित होते.  

नगरसेवक श्री. हर्णे म्‍हणाले, विद्‍यमान सत्ताधार्‍यांनी आतापर्यंत शहराच्‍या विकासासाठी एक रुपयाचा निधी आणलेला नाही. सर्व कामे पालकमंत्री नीतेश राणे यांच्‍या माध्‍यमातून त्‍यावेळी आम्‍ही मंजूर करून आणली होती. त्‍यानंतर विद्‍यमान सत्ताधार्‍यांनी पहिलेच काम न. पं. सभागृहाचे केले. मात्र, आमच्‍या एका नगरसेविकेचा किरकोळ धक्‍का लागून न. पं. च्‍या सभागृहातील स्‍टेजचा भाग कोसळला. वास्‍तविक आमच्‍या, भाजपच्‍या गटनेत्‍या डॉ. सुप्रिया नलावडे यांनी सदर न. पं. सभागृह कामाचे अंदाजपत्रक मागितले होते. मात्र, ते त्‍यांना देण्‍यात आलेले नाही.

मात्र, सोमवार, मंगळवारी आम्ही सदर कामाचे अंदाजपत्रक, कामाचे बिल अदा झाल्‍याचे पुरावे मागवणार आहोत. सदर सभागृह कामात पूर्वीचेच जुने साहीत्‍य वापरले आहे का, याचा पोलखोल सर्वांसमोर ठेवणार आहोत. विद्‍यमान सत्ताधारी सत्तेत आल्‍यानंतर इतरही अनेक कामे चालू असून त्‍याचाही पोलखोल आम्‍ही करणार असल्‍याचे हर्णे म्‍हणाले.

विद्‍यमान सत्ताधारी सत्तेत आल्‍यानंतर आतापर्यंत एकही रुपयांचा निधी आणू शकलेले नाहीत. पण, यापूर्वी आमच्‍याच प्रयत्‍नांनी आलेल्‍या निधीत भ्रष्‍टाचार होत असेल तर यांचा भ्रष्‍टाचारमुक्‍त कणकवलीचा नारा कुठे गेला, असा सवालही हर्णे यांनी केला. 

नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांनी न. पं. सभेत मला निलंबीत करण्‍याची धमकी दिली. पण, मला निलंबीत करण्‍यासाठी यांना दहा जन्‍म घ्‍यावे लागतील, असा इशाराही हर्णे यांनी दिला. तर न. पं. सभागृहाचे बोगस काम करणार्‍या आर्किटेक्‍ट, इंजिनियर यांच्‍यावर कारवाई झाल्‍याशिवाय आम्‍ही शांत बसणार नाही. हिंमत असेल तर नगराध्‍यक्षांनी या आर्किटेक्‍ट, इंजिनियर यांना निलंबीत करावे, असे आव्‍हानही हर्णे यांनी दिले. सदर कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत आम्‍ही सभागृहात बसणार नाही, असेही हर्णे म्‍हणाले. 

न. पं. मध्‍ये सत्तापालट झाल्‍यानंतर पहील्‍याच सभेत सत्ताधार्‍यांनी पहीला ठराव हा आम्‍ही मंजूर करून आणललेली ती २१ कामे रद्‍द करण्‍याचा घेतला. पालकमंत्र्‍यांच्‍या माध्‍यमातून पाठपुरावा करून आम्‍ही हा निधी आणला होता. कामे रद्‍द झाल्‍यास भविष्‍यात कामांची किंमत वाढेल व त्‍याला नगराध्‍यक्ष जबाबदार असतील, असेही आम्‍ही सांगितले होते. अखेरीस आता जिल्‍हाधिकारी यांच्‍या निर्णयानंतर नगराध्‍यक्षांना उपरती झाली व आता त्‍यांनी आपली भूमिका बदलली. मात्र, हेच शहाणपण त्‍यांना आधी सूचले असते तर शहराचे नुकसान झाले नसते, असा टोलाही हर्णे यांनी लगावला. 

आमच्‍यावर भ्रष्‍टाचाराचे आरोप करून विद्‍यमान सत्ताधारी सत्तेत आले. त्‍यांनी आमच्‍या काळात झालेल्‍या भ्रष्‍टाचाराची चौकशी जरूर करावी. आम्‍ही केलेली दर्जेदार कामे त्‍यांनी बघावीत. आमच्‍या काळात झालेले रस्‍ते सलग पाच वर्षे टिकले, असेही हर्णे म्‍हणाले.


ताजी बातमी

View all

Ashok Leyland truck involved in a rash driving case registered by Sawantwadi Police at Amboli Police Checkpost in Sindhudurg.
Amboli Rash Driving Case : बांदा-संकेश्वर महामार्गावर बेदरकार ट्रक चालवणे पडले महागात
November 28, 2026
सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची कारवाई
November 28, 2026
Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg District Collector Trupti Dhodmise inspects proposed earthen check dam sites on the Terekhol River to address summer water scarcity.
Sindhudurg Water Shortage : पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे
November 28, 2026
एकपात्री अभिनय स्पर्धेचे सुदन कवठणकर यांच्याहस्ते थाटात उद्घाटन
November 28, 2026
भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
November 28, 2026
MLC Dnyaneshwar Mhatre meets Prajakt Chavan in Kankavli as the new Sindhudurg district executive committee of Shivchhatrapati Teachers Association is announced.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा
November 28, 2026