
सावंतवाडी : शहरातील सालईवाडा परिसरात अवैधपणे गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कारवाई करत ११ हजार ३८० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी संदीप वेंगुर्लेकर आणि नेल्सन फर्नांडिस अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री सालईवाडा येथील एका ठिकाणी कोणताही परवाना नसताना अवैधपणे गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून ११ हजार ३८० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली.
पोलिसांनी त्याच्याकडे या दारूसाठ्याबाबत अधिक चौकशी केली असता हा माल नेल्सन फर्नांडिस याने आणून दिल्याचे त्याने सांगितले. संदीप वेंगुर्लेकर याला नोटीस बजावण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंगाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








