LIVE UPDATES

लाकडाच्या खोपीतून दारू विक्री

पोलिसांचा छापा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 16, 2026 20:15 PM
views 155  views

महिलेवर गुन्हा 

कुडाळ : जांभवडे येथे बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची विक्री करणाऱ्या एका ५१ वर्षीय महिलेवर कुडाळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ३,६०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे.

दिनांक १६ जून २०२६ रोजी सकाळी ११:४५ वाजता जांभवडे ख्रिश्चनवाडी येथील एका लाकडाच्या खोपीच्या पाठीमागे ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला नतालीन फ्रान्सीस डिसोजा (वय ५१, रा. जांभवडे ख्रिश्चनवाडी) ही विनापरवाना गोवा बनावटीच्या 'नॅशनल्स डॉक्टर ब्रँड'च्या ३० सीलबंद बाटल्या (किंमत ३,६०० रुपये) विक्रीसाठी बाळगून असताना रंगेहात सापडली.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/६१७ समीर रामचंद्र कोचरेकर यांनी फिर्याद दिली असून, मपोहेकॉ/१८ सावंत यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा (रजि.नं. २१७/२०२६) दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/३०५ तिवरेकर पुढील तपास करत आहेत.