LIVE UPDATES

सागर कारिवडेकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2026 17:28 PM
views 563  views

सावंतवाडी : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर कारिवडेकरला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.‌ पोलिसांकडून सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाकडून २९ एप्रिल पर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली आहे. 


खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना‌ तो चकवा देत होता. त्याला सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री कारिवडे येथून ताब्यात घेतले होते. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलिसांनी कोठडीची मागणी केली. यानुसार त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सागर कारिवडेकर याच्यावर ठाणे आणि मुंबई येथे देखील आर्थिक व्यवहारांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. गुंतवणूकदारांवर आपल्या माणसांकरवी हल्ला केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या कोठडी  दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील माहितीसह इतर माहिती घेतली जाणार आहे. तसेच त्यानंतर पुढील कार्यवाही देखील ठाणे पोलिसांकडून होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सावंतवाडीत घडलेल्या या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. यापूर्वीही सागर कारिवडेकर याच्या मालमत्तांवरही जप्ती आणली गेलीय.