
सावंतवाडी : तालुक्यातील सोनुर्ली जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या नव्याने मंजूर झालेल्या दोन वर्गखोल्यांचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या हस्ते आणि सोनुर्ली ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. या वर्गखोल्यांसाठी तब्बल २४ लाख रुपयांचा निधी श्री. गावकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.
जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्यांच्या भिंतींना तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. या वर्गखोल्यांबाबत पंचायत समिती सदस्य श्री. गावकर यांचे लक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मंजिरी गावकर व ग्रामस्थांनी वेधले होते.
श्री. गावकर यांनी तात्काळ याची दखल घेत या वर्गखोल्या नव्याने बांधण्यासाठी जिल्हा परिषद पातळीवर पाठपुरावा करत तब्बल २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. याच कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले.
श्री. गावकर यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागत असल्याने सर्व पालकवर्ग व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, गावचे मुख्य मानकरी राजू गावकर, बाळा गावकर, रमेश गावकर, नागेश गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंजिरी गावकर, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








