
देवगड : देवगड तालुक्यातील पोयरे मशवीवाडी येथे अवैध दारुविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला असता यावेळी तेथील दिलीप मांडवकर यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत चिरेबंदी गडग्यानजीक गैरकायदा बिगरपरवाना चोरटा दारुधंदा बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी तेथील संशयित योगेश विलास मयेकर याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या पोलिसांच्या छाप्यात सुमारे २ लाख ७ हजार ३६० रूपये किंमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त करण्यात आला असून पोलिसांकडू मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे पोयरे मशवीवाडी येथे अवैध दारुविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी तेथील दिलीप मांडवकर यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत चिरेबंदी गडग्यानजीक गैरकायदा बिगरपरवाना चोरटा दारुधंदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाळगलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी संशयित योगेश मयेकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकी स्कूटी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून ‘सदरची दारु माझीच आहे. काय ते करा’ असे म्हणून तेथून निघून जात असताना त्याच्या स्कूटीसमोर पुठ्याचे दोन ब्लॅक दारुचे बॉक्स पोलिसांना निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी तेथील सर्व अवैध दारुसाठा जप्त करीत संशयित योगेश मयेकर याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. यात सुमारे १ लाख २० हजार ९६० रूपये किंमतीचे ६३ पुठ्याचे दारुचे बॉक्स, सुमारे ६२ हजार ४०० रूपये किंमतीचे १० पुठ्याचे दारुचे बॉक्स, १४ हजार ४०० रूपये किंमतीचे २ पुठ्याचे दारुचे बॉक्स, ९ हजार ६०० रूपये किंमतीचे २ पुठ्याचे दारुचे बॉक्स असा सुमारे २ लाख ७ हजार ३६० रूपये किंमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई आचरा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश देसाई, पोलीस हवालदार मिलिंद परब, कॉन्स्टेबल डिसोजा, कॉन्स्टेबल वैजल यांनी केली.देवगड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस हवालदार आशिष कदम यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.














