LIVE UPDATES

आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा

महसूल विभागाच्या भूमिकेवर निलेश राणे काय बोलतात? याकडे लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 08:17 PM
views 98  views

सिंधुदुर्ग : आकारीपड जमिनींच्या वाटपाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ तालुक्यातील गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ मालवणचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकारीपड जमीनधारकांचे लक्ष लागले आहे.

माणगाव खोर्‍यातील आकारीपड जमिनींच्या वाटपाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आकारीपड जमिनींचे वाटप करण्याबाबत आदेश दिलेले असतानाही महसूल विभागाकडून प्रत्यक्ष वाटप प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची भावना जमीनधारकांमध्ये आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही जमिनींचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संबंधित जमीनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आकारीपड जमिनींचा प्रश्न केवळ आमदार निलेश राणेच सोडवू शकतात, अशी आशा आणि विश्वास जमीनधारकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे या मेळाव्यात महसूल विभागाच्या अडथळ्यांबाबत कोणती भूमिका मांडतात? तसेच आकारीपड जमीनधारकांना प्रश्न सोडविण्यासाठी कोणते ठोस आश्वासन देतात? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? महसूल विभागाकडून निर्माण होणारे अडथळे कसे दूर केले जाणार? तसेच आकारीपड जमीनधारकांना त्यांच्या जमिनींचे वाटप कधी मिळणार? असे अनेक प्रश्न या मेळाव्यात उपस्थित होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला उद्याच्या मेळाव्यातून निर्णायक दिशा मिळणार का? याकडे आता संपूर्ण माणगाव खोर्‍याचे लक्ष लागले आहे. माणगाव खोऱ्यातील आकारीपड आणी वहीवाट धारक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन याचिकाकर्ते आणि आकारीपड कृती समिती यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg
अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
November 19, 2026
संबंधित बातम्या

फळपीक विम्याच्या १० गुंठे क्षेत्राच्या अटीत शिथिलता द्या
November 19, 2026