LIVE UPDATES

अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवारास पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 19, 2026 08:19 PM
views 229  views
Nitesh Rane hands over appointment letter to Shailesh Newalkar under compassionate appointment scheme in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पात्र उमेदवार शैलेश संतोष नेवाळकर यांना कणकवली नगरपंचायतीमध्ये लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त विनायक अंधेरकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या माध्यमातून शैलेश नेवाळकर यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांना लिपिक पदावर नियुक्ती दिली आहे.

ताजी बातमी

View all

Cyber fraud incident involving a merchant who allegedly lost Rs 92000 through PhonePe UPI in Achara Sindhudurg
Cyber Fraud : फोनपे यूपीआयच्या माध्यमातून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक
November 19, 2026
Nitesh Rane reviews Sindhudurg drought management plan and water scarcity measures at district collector office
Sindhudurg Drought Management Plan : टंचाई आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करा
November 19, 2026
Nitesh Rane reviews new Marine Engine Fitter and Marine Fitter courses in Sindhudurg ITIs
Marine Courses in Sindhudurg ITI : जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करणार
November 19, 2026
आकारीपड जमीन प्रश्नावर उद्या गोठोस तिठा येथे महत्त्वपूर्ण मेळावा
November 19, 2026
संबंधित बातम्या

फळपीक विम्याच्या १० गुंठे क्षेत्राच्या अटीत शिथिलता द्या
November 19, 2026