LIVE UPDATES

खवल्या मांजराचे खवले - सांबर शिंगे प्रकरण ; संशयितास जामीन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 04, 2026 18:09 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी : खवल्या मांजराचे खवले व सांबराची शिंगे बाळगल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित गणेश प्रदीप शिर्के (रा. पडवे, ता. कुडाळ) यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

२९ मे रोजी रान बांबुळी-अनावकरवाडी मार्गावर पोलिस व वन विभागाने संयुक्त कारवाई करत संशयिताविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर त्याला पोलिस व न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, संशयिताच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी दाखल केलेला जामीन अर्ज ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके यांनी मंजूर करत ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात ॲड. पंकज खरवडे यांनी सहकार्य केले.