तब्बल 7 लाख 92 हजार 520 रुपयांची ऑनलाईन फसवणूक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 07, 2026 20:31 PM
views 143  views

देवगड : महानगर गॅस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत एका  व्यक्तीच्या अकाऊंटवरुन तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांवर डल्ला मारल्याची घटना देवगड तालुक्यातील जामसंडे येथे घडली.  ५ एप्रिल २०२६ रोजी ०९.३० वा ते १०.३० वा. च्या दरम्याने जामसंडे श्रीकृष्णगर येथे घडली आहे. या घटनेतील संशयित आरोपी विरुद्ध बीएनएस कलम ३१८(२), ३१८(४)३१६(२) , माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६((क), ६६(ड ) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामसंडे परिसरातील एका इसमाच्या मोबाईल वर महानगर गॅसचा लोगो असलेल्या मोबाईल क्रमांकावरून कोणीतरी दिवेश नामक अज्ञात इसमाने मेसेज करून फिर्यादीचे यांचे माहीम मुंबई येथे असलेले महानगर गॅस कनेक्शन अकाउंट नंबर अपडेट करण्याच्या बहाण्याने व्हाट्सअप क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने Mahanagar gas bill update. Apk फाईल पाठवून सदरची फाईल डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. त्या व्यक्तीने आरोपी वर विश्वास ठेवून apk फाईल डाऊनलोड केली त्यानंतर फिर्यादी यांचे मोबाईलवर आलेल्या विंडो वर फिर्यादी यांचे बँक ऑफ इंडिया खात्याच्या डेबिट कार्डचे सर्व माहिती भरल्यानंतर फिर्यादी यांचे खात्यातून एकूण रक्कम ७,९२,५२०/- इतकी रक्कम आरोपीने आपण महानगर गॅस कंपनी मधून बोलत असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा फिर्यादीचा यांचा विश्वासघात करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी याने आपले खात्यावर वळवून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून  फिर्याद देवगड पोलीस ठाण्यात बँक खात्याचा उतारा घेऊन समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून देवगड पोलीस  ठाण्यात दिवेश नामक अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून देवगड पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.