वैभववाडीत गोळीबार

एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2026 07:55 AM
views 1214  views

वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाला. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कशामुळे झाला, अपघाती की अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.