LIVE UPDATES

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मिठमुंबरीतील एक ताब्यात

देवगड पोलिसांची कारवाई : दारुसह ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 07, 2026 21:08 PM
views 185  views

देवगड : मिठमुंबरी बागवाडी येथील देवगड-कुणकेश्वर मार्गावर अ‍ॅक्टिव्हा स्कुटीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीवर देवगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास करण्यात आली. 

या प्रकरणी अविनाश जयवंत मोहिते (वय ५७, रा. देवगड किल्ला) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बागवाडी येथील देवगड-कुणकेश्वर मार्गावर अ‍ॅक्टिव्हा स्कुटीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत १८ हजार रुपये किमतीची दारू तसेच ७० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा स्कुटी असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई महेंद्र महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल रवी महाले आणि पोलीस कॉन्स्टेबल डोईफोडे यांनी केली. प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.